प्रभासचे (Prabhas) चहाते आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबरला अयोध्येत प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे टीझर पोस्टर समोर आले आहे. दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित या चित्रपटात बाहुबली प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत (Baahubali Prabhas playing the role of Lord Rama) आहे. त्याच्या व्यक्तिरेखेची झलक नव्या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.
आदिपुरुषच्या टीझर पोस्टरमध्ये प्रभास (Prabhas) पौराणिक कथेतील श्रीराम च्या श्रीरामांच्या कपड्यात दिसत आहे. या पोस्टरमध्ये प्रभास हातात धनुष्य बाण घेऊन गुडघ्यावर बसला आहे. त्याने आकाशाकडे बघत आपला धनुष्यबाण ताणून धरला आहे. अभिनेत्याचा हा फर्स्ट लुक प्रभू श्री रामाच्या योद्धा अवतारातील आहे. हा पोस्टर समोर येताच प्रभासचे (Prabhas) चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. हा चित्रपट जबरदस्त असणार आहे, हे प्रभासच्या लूकवरून स्पष्ट होत आहे.
पोस्टर शेअर करताना अभिनेता प्रभासने कॅप्शन लिहिले, ‘आरंभ’. अयोध्येतील सरयू नदीच्या काठी आम्ही आमचा प्रवास सुरू करणार आहोत, आमच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर आणि टीजर आमच्यासोबत अयोध्येत 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.11 वाजता अनावरण करायला तयार राहा. बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
आदिपुरुष या चित्रपटात रामायणाची कथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये प्रभाससोबत क्रिती सेनन, सैफ अली खान आणि अभिनेता सनी सिंह निज्जर (Sunny Singh Nijjar) दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत (Om Raut) यांनी केले असून भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. आदिपुरुषचे बजेट ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यासह, हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. त्याच्या व्हिज्युअल इफेक्टवर 250 कोटी रुपये खर्च झाल्याचेही सांगितले जात आहे.
प्रभासच्या या चित्रपटाचे एकाच वेळी हिंदी आणि तेलुगू (Hindi and Telugu) भाषेत शूटिंग झाले आहे. त्याची कथा ओम राऊत यांनी कोविड-19 च्या लॉकडाऊनमध्ये लिहिली होती. प्रभासला ही कथा आवडली आणि त्याने यात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह तर क्रिती सेनन सीताच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा हिंदी आणि तेलुगू तसंच तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्याची रिलीज डेट 12 जानेवारी 2023 ठेवण्यात आली आहे.