2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) काही खास वर्ष ठरणार नाही आहे. बड्या स्टार्सचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरत आहेत. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) खास मुहूर्तावर प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा (Akshay Kumar) चित्रपट ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan)आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadha) हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. मात्र आता बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा 2 मोठ्या चित्रपटांची टक्कर होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मणिरत्नम दिग्दर्शित ’पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) आहे, तर दुसरीकडे हृतिक आणि सैफ अली खानचा (Hrithik and Saif Ali Khan) ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट आहे.
बुक माय शो या सिनेमाच्या तिकीट बुकिंग वेबसाईटबद्दल सांगायचे तर, हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाला 82.1 हजार लाईक्स मिळाले आहेत, तर ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchans) ‘’पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) या चित्रपटाला 384.3 हजार लाईक्स मिळाले आहेत.
हा आकडा पाहता ऐश्वर्याच्या चित्रपटाने बाजी मारल्याचे दिसते. बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळनार हे पाहाव लागणार आहे.’पोन्नियिन सेल्वन’ हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय, त्रिशा, जयम रवी आणि कार्ती सारखे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
तस बघितल तर हे वर्ष साऊथच्या चित्रपटांसाठी चांगलं ठरल आहे. ‘पुष्पा’ चित्रपट असो की ‘आरआरआर’, सर्वांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट सुमारे 170 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे. जो त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्याची तमिळ आवृत्तीही पुष्कर आणि गायत्री या दिग्दर्शकांनी हिंदीत दिग्दर्शित केली आहे