TOD Marathi

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. आता एकनाथ शिंदे नव्या एका कारणामुळे चर्चेत आहेत. आणि त्याचं कारण आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, (Ashok Chavan) राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दावा केलाय की फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकारचा प्रस्ताव होता आणि जेव्हा या प्रस्तावा संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ आलं होतं तेव्हा या शिष्टमंडळात स्वतः विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश होता. मात्र त्यानंतर ही चर्चा फार काही पुढे गेले नाही.

यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी एकदा शरद पवार साहेब यांच्याशी संपर्क साधायला लावला. एकदा पवार साहेबांशी बोला आणि त्यांचे मत घ्या असेही सुचवलं. त्यामुळे हिंदुत्ववादाची गोष्ट करत एकत्र आलेले शिंदे-फडणवीस सरकार या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या या मुद्द्याला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी अप्रत्यक्ष समर्थन दिलं आहे. भाजपच्या जाचाला कंटाळून तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. असे देखील खासदार विनायक राऊत म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील एक खळबळजनक दावा केला आहे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलेले एकनाथ शिंदे हे या सर्व वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, त्यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आणि विशेषतः शिंदे गटाचे नेते या संदर्भात काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.