मी एक लाख वेळा मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे, पण आम्हाला टिकाऊ आरक्षण मिळायला पाहिजे, असं म्हणत तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली (Apologized for the controversial statement) आहे. उस्मानाबादमध्ये (Osmanabad) एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विरोधकांवर टीका करताना मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली असं सावंत म्हणाले होते. त्यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली होती आणि तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशाराच दिला होता.
त्यानंतर अखेर सावंत यांनी माफीनामा सादर केला आहे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण 2020 ला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकू शकलं नाही. या दोन वर्षात कोणताही मराठा समाजातील नेता एक शब्द बोलला नाही पण राज्यात सत्तांतर होताच यांना मराठा समाजाची, मराठा आरक्षणाची आठवण आली. यातून द्या, त्यातून द्या असं करून समाजा-समाजात दरी निर्माण करून भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर मी बोट ठेवलं होतं आणि हे कोण करतंय हे जनतेला माहिती आहे. यावर मी बोलत होतो, असं तानाजी सावंत म्हणाले.
राहिला प्रश्न माफीचा तर ज्या समाजाच्या जीवावर मी ताठ मानेने फिरतो, त्यांची माफी मागतो. त्यांच्या मनाला काही खटकलं असेल तर माझ्या समाजाची माफी मागायला मला लाज वाटत नाही. मी म्हटलं होतं आम्हाला थोडा वेळ द्या, मराठा आरक्षणाचं गेल्या दोन वर्षात जे काही नुकसान झालं त्यात सुधारणा करण्यासाठी आम्हाला वेळ लागेल. 2024 पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर तानाजी सावंत राजीनामा देऊन तुमच्या सोबत मोर्चात सामील होईल. माझ्या वक्तव्याने ज्या मराठा संघटना नाराज झाल्या असतील, त्यांच्या मनाला वेदना झाल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, असंही तानाजी सावंत म्हणाले.