सोशल मीडिया (Social media) वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. व्हॉट्सअँप आणि फेसबुकद्वारे (Whatsapp And Facebook) कॉल केल्यास आता पैसे मोजावे लागू शकतात. सरकारने यासंदर्भात देशातील नागरिकांची मते मागवली आहेत. हा निर्णय झाल्यास व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून कॉलिंग आणि मेसेजची ( Call And Message) सुविधा ही सेवा मानली जाईल, ज्याकरीता या कंपन्यांना लायसन्स घ्यावं लागेल, पर्यायाने या सेवेकरता शुल्क अर्थात पैसे मोजावे लागतील.
व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या कंपन्या ग्राहकांना या सुविधा मोफत उपलब्ध करुन देत असल्याने आपल्याला नुकसान सोसावं लागतं, असा तक्रारीचा सूर टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom Companies) लावलाय. ज्यावर आता लोकांची मतं जाणून घेण्यासाठी सरकारने पावलं टाकली आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत नागरिक यावर आपली मतं देऊ शकतात. नंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे.
फेसबुक आणि व्हाट्सअपने कॉलिंग या फीचरला पैसे घेतल्यास खर्च वाढणार आहे. त्यामुळे या संदर्भात देशभरातील नागरिक काय मतं नोंदवतात आणि त्यापुढे टेलिकॉम कंपन्या काय भूमिका घेतात हे बघावे लागणार आहे.