दसरा मेळावा (Dasara Melava)आमचाच होईल अशी वक्तव्य दोन्ही ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून करण्यात येत होती. त्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने पोलिसांकडून अहवाल दिला होता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही गटांचे अर्ज मुंबई महानगरपालिकेने नाकारले होते. त्यानंतर शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढे सदा सरवणकर यांनी देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray, Eknath Shinde) यांच्यासह मुंबई महापालिका अशा तीनही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आणि कोर्टासमोर युक्तिवाद केला. ही सुनावणी पार पडल्यानंतर निकालपत्राचे वाचन सुरू झालेले आहे. आणि स्थानिक आमदार शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
शिंदे गटाचे नेते आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांची याचिका फेटाळल्यानंतर हा शिंदे गटाला हायकोर्टाचा धक्का मानला जातो. शिवाजी पार्क दसरा मेळावा उद्धव ठाकरे (Shivaji Park Dasara Melava Uddhav Thackeray) यांचाच होणार हे न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. मातोश्री बाहेर किंवा शिवसेनाभवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले. त्यांनी आनंद साजरा केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांनी आनंद साजरा केला. आपला विजय झाला हा आनंद निश्चितच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाजूच्या लोकांना आहे.
मात्र, यानंतर शिंदे गट या संदर्भात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित शिंदे गटाकडून यासंदर्भात उद्यापर्यंत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येऊ शकते. त्यामुळे जर सुप्रीम कोर्टात शिंदे गट गेलं तर आणखीन पुढे काय होईल हे देखील बघणं औत्सुकत्याचं ठरणार आहे. मात्र, तूर्तास हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता येणार आहे.