बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत या अभिनेत्रीचे नाव जोडले गेले तेव्हापासून ती पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहे. दररोज पोलीस त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगतात. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनंतर आता दिल्ली पोलीस नोरा फतेहीची चौकशी करणार आहेत. नोराची आज आर्थिक गुन्हे शाखा (EOW) प्रकरणात चौकशी होणार आहे. (Nora fatehi connection with money laundering case )
हे संपूर्ण प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या खंडणीचे आहे. काही दिवसांपूर्वी ईओडब्ल्यूने नोरा फतेहीची याप्रकरणी चौकशी केली होती. आज पुन्हा एकदा 11 वाजता तीला पोलिसांसमोर हजर व्हायचे आहे. त्याचवेळी या प्रकरणात अडकलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची बुधवारी तब्बल आठ तास चौकशी झाली तर त्यानंतर आता पुन्हा एकदा नोराला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.(money laundering case )
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीला सुकेशकडून अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या. ती चेन्नईतील एका कार्यक्रमाचा भाग बनली, ज्याचा सुकेश चंद्रशेखरशीही (fraud Sukesh Chandrasekhar) संबंध आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीने (Nora fatehi)दावा केला होता की, चेन्नईतील कार्यक्रमात तिला या गुन्ह्याशी निमंत्रित करण्यात आले होते याची तिला कल्पना नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना जॅकलीन(Jacqueline Fernandez) आणि पिंकी इराणीचे ( Pinky Irani) उत्तर वेगळे असल्याचे आढळले. दोघांचीही उत्तरे न मिळाल्याने आता दोघांनाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंकी इराणी यांना गुरुवारी म्हणजेच आज दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र,अद्याप जॅकलिनला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.