TOD Marathi

मुंबई : वेदांता समूहाने (Vedanta) तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प (Semiconductor) गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. आता मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत.वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात यावा यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. राज्य सरकारने वेदातां-फॉक्सकॉन समूहाला मोठी सवलत दिली असल्याचे समोर आले.

महाविकास आघाडीकडून 39 हजार कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. सेमी कंडक्टरच्या प्रकल्पासाठी तळेगावमधली 400 एकर जागा मोफत तर प्रकल्पासाठी देण्यात येणारी 700 एकर जागा ही 75 टक्के दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पासाठी लागणारी विज पुरवठा 20 वर्षासाठी तीन रुपये प्रति युनिट दराने देण्याचा निर्णय देण्यात आला होता. या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वीस वर्ष दररोज 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार होता. पाणीपट्टीमध्ये 337 कोटी रुपयांची सूट देण्यात येणार होती. वीजेच्या दरात दहा वर्षांसाठी साडेसात टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तसेच वेदांता ग्रुप महाराष्ट्रात आला असता तर महाराष्ट्राला त्याचा काय उपयोग होता. सेमीकंडक्टर निर्मिती देशात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती.