TOD Marathi

बॉलिवूडचे सर्वोत्कृष्टजोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर( Alia Bhatt and Ranbir Kapoor) लवकरच आई-वडील होणार आहेत. आलिया भट्ट गरोदरपणात तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे .काही महिन्यांपूर्वीच ही गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली. आलियाचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(Alia Bhatt pregnant )
याच वेळी, काही महिन्यांनंतर, त्यांच्या घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येणार आहे. कपूर कुटुंबीयदेखील नवीन पाहुणाच्या आगमनासाठी आतुर आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच आलियाची आई म्हणजेच सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर या दोघी मिळून आलियाच्या डोहाळ्या जेवणाची तयारी करत आहे.

बाळाची आजीने खूप खास मोठा प्लॅन केला आहे. बेबी शॉवर कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे या बेबी शॉवरमध्ये फक्त महिलाच सहभागी होणार आहेत. (Alia Bhatt baby shower program )

आलियाचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईतच होणार आहे, मात्र डोहाळे जेवण कुठे होणार हे अद्याप समोर आलेले नाही. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या घरी लग्नासारखा असेल की बाहेर, हे काही दिवसांतच कळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहीन भट्ट,(Shaheen Bhatt) रणबीरच्या बहिणी करीना कपूर खान, करिश्मा कपूर, (Rabbir sister Kareena Kapoor khan, Karishma Kapoor)आकांक्षा रंजन सिंह, नव्या नंदा, (Navya Nanda Shweta Bachchan)श्वेता बच्चन, आरती शेट्टी आणि आलियाच्या बालपणीच्या मैत्रिणी डोहाळे जेवणाचा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.

नुकताच आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. (brahmastra Alia Bhatt Ranbir Kapoor)