मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon grave) कबरीचं सुशोभीकरण झाल्याची बातमी आली आणि सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली. याकूब मेमनच्या कबरीवर एलईडी लाइट्स (Grave of Yakub Memon decorated with LED lights) लावण्यात आल्या होत्या. त्या एलईडी लाइट्स आता पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. देशाचा शत्रू असलेल्या याकूब मेमन च्या कबरीची सजावट केल्याची बातमी आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत.
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाच्या वृत्ताची दखल तातडीने घेत दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तान परिसरात पोलिसांनी धाव घेतली आणि एलईडी लाईट्स काढले. सदर एलईडी लाइट्स मार्च महिन्यात लावल्याची माहिती पुढे येत आहे.
शब-ए-बारातच्या दिवशी हे लाईट्स लावल्याची देखील माहिती आहे. या दिवशी लोक पूर्वजांच्या कबरीवर प्रार्थनेसाठी जातात. त्यावेळी या कबरीवर हे लाइट्स लावण्यात आले अशी माहिती तपासात समोर येत आहे.