नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणारी ही सर्वात वादळी सुनावणी आता 27 सप्टेंबरला होणार आहे.
27 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना यावेळेस सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता पुन्हा २० दिवस पुढे ढकलला गेला आहे.
यावेळी शिंदे (Shinde) गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचे मागणी केली. तर ठाकरे (Thackeray) गटाकडून असा युक्तिवाद करण्यात आला की चिन्हाचा निर्णय घेण्याआधी आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्यात यावा. त्यामुळे 27 तारीख महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष लांबणीवर पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटनापीठाला आवश्यक वेळ नक्की दिला जावा. पण जास्त वेळ काढूपणा होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळेस व्यक्त केले आहे