TOD Marathi

गेल्या महिन्यात अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) ‘पेपर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) केलं होतं. त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले होते आणि त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती. याप्रकरणी त्याच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस त्याच्या घरीदेखील पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी नव्हता. यासाठी पोलिसांनी रणवीर सिंगला 22 ऑगस्टपर्यंत जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. आता रणवीरने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

 

रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. तो शूटिंगसाठी बाहेर गेला होता. त्यामुळे पोलिसांना समन्स न सोपवताच परतावं लागलं होतं. मात्र, मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाऊन नोटीस देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्याआधीच रणवीरच्या बाजूने ही बातमी समोर आली आहे. याप्रकरणी रणवीर 22 ऑगस्टला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहणार होता.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर महिला आयोगानेही आक्षेप घेतला होता. तसेच रणवीर सिंगच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स उभे राहिले. काही जणांनी त्याची जोरदार स्तुतीही केली होती. फोटोशूटनंतर रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे फोटोही शेअर केले होते. रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.