TOD Marathi

मुंबई :

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे.  22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती.  दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली आहे. महाराष्ट्रातील (Eknath Shinde) सत्तासंघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलाय.

एकनाथ शिंदे यांचे बंड, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेले सरकार याबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडलेली आहे. २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती. मात्र आता ती सुनावणी उद्या होणार नाही. तर ही सुनावणी 1 दिवस पुढे म्हणजे 23 ऑगस्टला होणार आहे.

यापूर्वीही दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा ही सुनावणी पुन्हा पुढे गेली आहे. 12 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी थेट 22 ऑगस्टला ठेवण्यात आली. मात्र, आता 22 ऑगस्टची सुनावणी 23 ऑगस्टला होणार आहे.

 

खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाकडे जाणार? यावर सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी  होत आहे. सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर उदय लळीत यांची नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. यामुळे सुरुवातीपासून हे प्रकरण हाताळत असलेले सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ही याचिका मार्गी लावतात की उदय लळीत यांच्याकडे हे प्रकरण जाते हे 22 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होणार होते, ते आता कदाचित 23 ऑगस्टला होऊ शकते.