‘आझादी का अमृत महोत्सव’चे औचित्याने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर सुरू आहे. यामध्ये पुण्यात बाणेर येथे ‘नेटसर्फ नेटवर्क’च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. 120 फूट बाय 40 फूट एवढ्या भव्य आकाराचा तिरंगा ‘नेटसर्फ’ने आपल्या मुख्यालयात लावला असून राष्ट्राला वैशिष्ट्यपूर्ण अशी सलामी दिली आहे. (Azadi ka Amrit Mahotsav)
नेटसर्फ परिवाराने (Netsurf Network) त्यांच्या बाणेर येथील मुख्यालयात एकत्र येत संपूर्ण इमारतीला बाहेरून हा तिरंगा लावला. (Baner, Pune) या तिरंगा ध्वजाचे अनावरण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. (Minister Chandrakant Patil Hoisted Flag) यावेळी नेटसर्फ नेटवर्कचे सुजित जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तिरंग्यांपैकी हा एक तिरंगा आहे. गेल्या गेल्या बावीस वर्षाच्या कारकिर्दीत हजारो भारतीयांना नेटसर्फ कंपनीने आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करून त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आहे.
अनोख्या पद्धतीने राष्ट्राला वंदन करण्याचा नेटसर्फ नेटवर्कचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठया उत्साहात साजरा होत असताना भारतीयांच्या कल्पकतेने ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, याचा आनंद वाटतो. या इमारतीच्या भोवती सर्वात मोठा ध्वज लावल्याचा देखील मला आनंद आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.