शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात आज होत आहे. या सुनावणीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल तर शिंदे गटाची बाजू हरीश साळवे मांडत आहेत. (Kapil Sibbal, Harish Salve)
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची कारवाई, शिंदे गटाचे प्रतोद आणि गटनेते यांच्या मान्यतेविरोधातील याचिका, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळ्याच्या विरुद्ध याचिका, राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वास मताबाबत दिलेल्या निर्णयाबद्दलची याचिका, व्हीपचं उल्लंघन झाल्याबद्दलची याचिका अशा याचिकांवर सुनावणी करण्यात येत आहे. (Shivsena and Shinde group hearing in Suprem Court)
या पाचही याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, मागच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने शिवसेना आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्राच्या द्वारे काही माहिती द्यायची असल्यास किंवा काही कागदपत्र द्यायचे असल्यास ते देता येतील असे सांगितले होते. त्यानुसार दोन्ही गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत.
ही सुनावणी अतिशय महत्त्वाची असणार आहे. या सुनावणीकडे केवळ शिवसेनेचे नव्हे तर शिवसेनेसह शिंदे गट आणि राज्यातील सर्वच पक्षांचे लक्ष लागलेलं असेल.