हिंगोली : जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने आसना नदीला पूर आला आहे. यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला नागरिकांची काळजी घेत आवश्यक सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत. (CM Ekanath Shinde ordered administration to take care of people)
नदीच्या जवळ असणारं कुरुंदा गाव पाण्याखाली गेलं आहे. या बरोबरच नदीपात्राच्या जवळ असणाऱ्या काही गावात देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी स्वतः हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. (CM took review of flood situation in Hingoli district) पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे व त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफची पथके (NDRF team) पाठवण्याची सूचना केली. काही लागल्यास स्वतः कळवावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.