TOD Marathi

पंढरपूर :
यंदाची आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. (Ashadhi Ekadashi Mahapuja performed by CM Ekanath Shinde) यासोबतच शासकीय महापूजेमध्ये बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रुई गावामधील मुरली भगवान नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना पुजेचा मान मिळाला आहे. मुरली नवले यांनी आपण गेल्या 35 वर्षांपासून नियमित वारी करत असल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजेचा मान मिळालेलं बीड जिल्ह्यातील नवले दाम्पत्य आपल्या गावात शेती करतात. नवले कुटूंब हे 1987 पासून वारी करत आहेत. मुरली नवले यांनी दरवर्षी न चुकता सातत्यानं आपली वारी (Ashadhi Wari Pandharpur) सुरु ठेवली आहे. यंदा आषाढीवारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. त्यामुळं वारकऱ्यांमध्येही मोठा उत्साह आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून वारकऱ्यांनी आपली उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे.

चंद्रभागेच्या तिरावर स्नान करण्यासाठी लाखो वारकऱ्यांसह भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Chandrabhaga River) या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या विठूरायाच्या दर्शनाची आस डोळ्यात घेऊन आल्याचे पाहायला मिळताहेत आणि सर्वत्र टाळ मृदंगाच्या गजरात विठूमाऊलीचा जप करताना दिसत आहेत.