मुंबई :
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार आलं. (Uddhav Thackeray resigned and Eknath Shinde become CM) एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात परतल्यानंतर केलेल्या वक्तव्यांमुळं शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आजपासून निष्ठा यात्रा जाहीर केली आहे. (Aaditya Thackeray on Nishtha Yatra from today onwards) या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याचा या यात्रेचा उद्देश आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंड केलं. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबद्दल सरकार कोसळण्यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती. (Aaditya Thackeray was aggressive after rebel of MLAs) त्यानंतर सत्तांतर झालं. दरम्यानच्या काळात राज्याबाहेर असलेल्या आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दाखल झाल्यानंतर केलेल्या वक्तव्यांनतर निर्माण झालेला शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जाईल.
कसं असेल निष्ठा यात्रेचं स्वरुप?
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Shivsena) यांच्या निष्ठा यात्रेला आज सुरुवात होत आहे. शिवसेनेच्या २०० पेक्षा अधिक शाखांना आदित्य ठाकरे यानिमित्तानं भेटी देणार आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही ही निष्ठा यात्रा जाणार आहे. सेनेच्या शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्ते यांची भेट आदित्य ठाकरे यानिमित्तानं घेतील. (Aaditya Thackeray will meet Shivsainik, Gat pramukh, Shakha pramukh and party activists) सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न देखील यानिमित्तानं करण्यात येईल.
ठाकरेंची ‘रिक्षावाला’ कमेंट झोंबली, शिवबंधन सोडलं, ३० वर्षांची साथ सोडून मनसेत प्रवेश
आदित्य ठाकरेंची आक्रमक भूमिका कायम
शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. आदित्य ठाकरेंनी आज माध्यमांशी बोलताना गद्दार हे गद्दार असतात. ज्यांना यायचं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना भवन आणि मातोश्री येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरु ठेवला आहे.