TOD Marathi

युवक बिरादरीच्या वतीने ‘वृक्ष स्नेही व युवा नेतृत्व शिबीर,’ मान्यवरांची उपस्थिती आणि युवकांशी संवाद

संबंधित बातम्या

No Post Found

युवक बिरादरी (भारत) संस्थेच्या वतीने आणि आत्मा मालिक शैक्षणिक संकुल यांच्या सहकार्याने “वृक्ष स्नेही व युवा नेतृत्व शिबिर” मोहिली, शहापूर (जि. ठाणे) याठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य अशा निसर्गरम्य वातावरणात पार पडले. {Vriksha Snehi and Youth Leadership Camp By Yuvak biradari (Bharat)}

 

या शिबिरात निसर्गाविषयी विविध गोष्टी शिबिरार्थींना कळाल्या. सोबतच नेतृत्व विकास, व्यवस्थापनाचे महत्त्व, स्पर्धेच्या युगात कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व, समूह चर्चा आणि मुलाखत या विषयांवर विविध तज्ज्ञांचे माहितीपूर्ण सत्र झाले. ‘एक सूर एक ताल’ चे प्रशिक्षण, खुला मंच या कार्यक्रमांनी तर विद्यार्थ्यांना भुरळ पाडली. ‘एक सूर एक ताल’ कार्यक्रमात सहभागी प्रतिनिधींसह स्थानिक परिसरातील जवळपास 1500 विद्यार्थ्यांना ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमाचा प्रशिक्षण देण्यात आलं. (Ek Sur Ek Taal Program)

युवक बिरादरीच्या या शिबिराला राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (Rajyasabha MP and Senior Journalist Kumar Ketkar), पु. ल. देशपांडे अकादमीचे संतोष रोकडे, युवक बिरादरीच्या संचालक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त स्वर क्रांती, व्हाईस चेअरपर्सन आशुतोष शिर्के, ज्येष्ठ बिरादर नागेंद्र राय, ज्येष्ठ बिरादर आणि पत्रकार पंकज इंगोले, निहार देवरुखकर, मेधा आणि धनंजय दिवेकर, ज्येष्ठ बिरादर पवन सिंग, मूक नाट्य कलाकार कुणाल मोटलिंग, अतुल सुंदरकर आणि समुह, सरिता बाला, देवेंद्र सिंग, गौरव इंगळे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

 

समारोपीय कार्यक्रमाला युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वनराईचे रविंद्र धारिया, रेखा शाह, युवक बिरादरीचे महासंचालक सुनील वालावलकर, प्रकल्प संचालक सरिता फुंडे, कांचन कांकरिया, आत्मा मालिक संस्थेचे हनुमंत भोंगळे आणि उमेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. (Padmashri Kranti Shah, Actress Rohini Hattangadi and other dignitaries were present)

 

विविध सत्रांच्या माध्यमातून शिबिरार्थ्यांना नवे विषय माहिती करता आले, त्या त्या क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधता आला. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधून आलेल्या युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला होता. (Delegates participated were from Maharashta, Karnataka, Uttar Pradesh, Bihar) प्रशांत वाघाये, ओंकार चव्हाण, एकता जोशी, सचिन वाकुलकर, अक्षय जाधव, ऋषिकेश गोखले, जयेश जाधव, सागर गुप्ता यांनी शिबिराचे व्यवस्थापन केले.