कोणताही गट शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही. अशाप्रकारे पक्ष ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे युक्रेन आहे का? (Shivsena isn’t Ukraine to capture, says Sanjay Raut) खऱ्या आणि खोट्या शिवसेनेचा प्रश्नच येत नाही. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना (Shivsena) असेल, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठणकावून सांगितले आहे. विधिमंडळात शिवसेना दुबळी झाली आहे, हे आम्ही मान्य करतो. मात्र महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात आजही तीच शिवसेना आहे. काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असे म्हणणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अपमान आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Press Conference at New Delhi)
यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीकाही केली. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी शिवसेना का सोडली, हा प्रश्न त्यांनाही पडला असेल. त्यांनी हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला ते माहिती नाही. मात्र, काल सभागृहात ‘ईडी, ईडी’चा (ED) गजर पाहता, यामागील कारणाची कल्पना येते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तविली आहे. मी शरद पवारांच्या वक्तव्याशी सहमत आहे. माझ्या माहितीप्रमाणे, भाजपच्या नेत्यांनी ही केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. भाजपला शिवसेना फोडायची होती आणि त्यांनी ती फोडून दाखवत फुटीर गटाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे’ असही संजय राऊत यांनी म्हटलं.