TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जुलै 2021 – येणाऱ्या गणेशोत्सावासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सावामध्ये कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. तशी घोषणा नवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय.

गणेशउत्सव काळात मुंबईमधून आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासियांची प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.

सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 रेल्वे गाड्या चालवणार आहोत.

गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड डेली स्पेशल या रेल्वे गाडीच्या एकूण 36 ट्रिप होतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रत्नागिरी बाय विकली स्पेशल या रेल्वे गाडीच्या 10 ट्रिप होणार आहेत.

पनवेल- सावंतवाडी रोड ट्राय विकली स्पेशल या रेल्वे गाडीच्या 16 ट्रीप होतील. पनवेल रत्नागिरी बाय विकली स्पेशल या रेल्वे गाडीच्या एकूण 10 ट्रीप होणार आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

आपण प्रत्येकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियम पाळले पाहिजेत. 72 रेल्वे गाड्या सोडूनही जर वेटींग असेल. प्रवासाची अडचण होत असेल तर रेल्वे मंत्रालयाने अधिक रेल्वे गाड्या सोडण्याचे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिलेत.

मात्र, कोकणवासीयाची प्रवासा दरम्यान कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेत आहोत, असं देखील दानवे यांनी सांगितलं आहे.