टिओडी मराठी, दि. 21 मे 2021 – सध्या देशात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. यातच पावसाळा ऋतू देखील सुरु झाला आहे. त्यामुळे ताप येणे आदी लक्षणं अनेकांमध्ये आढळत आहेत. यातच देशात औषधांची मागणी वाढली आहे. उत्तराखंडमधील कुमाऊ प्रांतामध्ये मागील काही दिवसापासून करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने येथे एका महिन्यात सुमारे 5 कोटी पॅरासिटामॉल गोळ्यांची विक्री झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. तर करोनावर उपाचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांच्या विक्रीचे आकडे दोन कोटींहून पुढे गेले आहेत.
उत्तराखंडमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाबाग्रस्तांची संख्या वाढू लागली आणि औषधांची विक्रीही वाढली आहे. अनेक ठिकाणी लोकांना आगाऊ औषधं घेऊन ठेवले आहे, असे दिसून आलं. येथील ऊधमसिंह नगर आणि हल्द्वानी येथून डोंगळार भागांत औषधांचा पुरवठा केला जातो.
अनेक डॉक्टर करोना रुग्णांसाठी एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन औषधच लिहून देत असतात. तसेच अनेक ठिकाणी साडेसहाशे एमजी पॅरासिटामॉल गोळी घेण्याचाही सल्ला डॉक्टर देतात. तसेच बी कॉम्पलेक्स, झिंकबरोबरच, क जीवनसत्व आणि आइवरमेक्टिनच्या गोळ्याही लिहून दिल्या जातात.
बी कॉम्पलेक्स झिंकसह क जीवनसत्वाच्या दोन दोन कोटी गोळ्यांची विक्री झाली आहे. त्यासह आइवरमेक्टिनच्या ५० लाख किंमतीच्या गोळ्या विकल्या गेल्या आहेत. कुमाऊंमध्ये ड जीवनसत्वाची पाकिटं आणि गोळ्यांची पाच लाखांच्या आसपास विक्री झाली आहे. श्व
सनासंदर्भातील त्रासांसाठी इन्हेलरचा वापर करण्याचा सल्लाही डॉक्टर देत असल्याने त्याचीही विक्री वाढली असल्याचं आढळलं आहे.
केमिस्ट अॅण्ड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी एका हिंदी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले कि, “पॅरासिटामॉल आणि अॅण्टीबयोटिक गोळ्यांची मागणी वाढली आहे. पॅरासिटामॉलचे सुमारे चार ते पाट कोटी आणि दोन दोन कोटी अॅण्टीबायोटिक गोळ्यांची विक्री झाली असून त्यासह जीवनसत्व क, जीवनसत्व ड आणि बी कॉम्पलेक्सबरोबरच झिंकच्या गोळ्यांचीही मागणी वाढली आहे.