पुणे NCP Office उद्घाटन प्रकरणी शहराध्यक्ष प्रशांत जगतापसह 5 जणांना अटक ; Corona नियमाचा केला भंग

टिओडी मराठी, पुणे, दि. 21 जून 2021 – कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 5 जणांना अटक केलीय. त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन केले होते.

पुणे शहरात आठवडा लॉकडाऊन लागू केल्यामुळे आणि कोरोनामुळे निर्बंध घातले असताना कार्यालयाच्या उद्घाटनासाठी प्रचंड गर्दी जमवली होती. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी हि कारवाई केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. नंतर रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

या सगळ्या प्रकरणावर भाजप नेते प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं होतं. या संपूर्ण प्रकरणात आयोजकांवर कारवाई करा, अशी मागणी भाजपकडून केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली असून पोलिसांनी प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख यांच्यासह एकूण सहा जणांना अटक केली आहे.

Please follow and like us: