टिओडी मराठी, पुणे, दि. 7 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दि. 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेसाठी चार दिवसांमध्ये 16 हजार 800 उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे.
राज्यातील अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांत शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधनकारक केले आहे. करोनामुळे ‘टीईटी’ ची परीक्षा लांबणीवर पडत होती. अखेर आता शासनाने ही परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याने ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियाजन केलं आहे.
परिषदेच्या संकेतस्थळावर ‘टीईटी’ अर्ज नोंदणी करण्यासाठी 3 ऑगस्टपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाली आहे.
अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत संधी दिली आहे. त्यानंतर 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येईल.
येत्या 10 ऑक्टोबर रोजी ‘टीईटी’चा पेपर क्रमांक 1 हा सकाळी 10.30 ते दुपारी 1 व पेपर क्रमांक 2 हा दुपारी 2 ते 4.30 या वेळेत असणार आहे.
आता ‘टीईटी’ला उमेदवारांची अधिक प्रमाणात नोंदणी होण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. आता दररोज दोन ते अडीच हजार उमेदवारांची अर्ज नोंदणी होत आहे. त्यात आता वाढ होऊ लागली आहे.
शेवटच्या टप्प्यामध्ये अर्ज भरणाऱ्यांची संख्या जलद गतीने निश्चितपणे वाढणार आहे, असे परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिलीय.