टिओडी मराठी, दि. 23 मे 2021 – महाराष्ट्र राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या शिफारशीबाबत कधी निर्णय घेणार? अशी विचारणा न्यायालयाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मात्र, याबाबत राज्यपालांकडून निर्णय येणे अपेक्षित असताना एक धक्क्कादायक माहिती समोर आलीय. ती म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची खुद्द राजभवनाकडे यादी नाही, असे माहिती अधिकारातर्गंत उघड झाले आहे.
सध्या न्यायालयाने राज्यपालांकडे याबाबत निर्णय केव्हा घेणार?, असा सवाल राज्यपालांच्या सचिवांना केला आहे. न्यायालयाच्या या रोखठोक भूमिकेमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना धक्का दिला आहे. त्यानंतर राज्यपालांना अजून एक धक्का बसणारी घटना घडलीय. ती म्हणजे राजभवकडेच त्या १२ आमदारांची यादी नाही, अशी माहिती समोर आली आहे.
राज्यपाल नियुक्त जागांवर महाविकास आघाडीच्या वतीने नावे पाठवल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यपालांनी निर्णय का घेतला नाही? याची कारणे प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिलेत. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांचा कधी विचार करणार? तेही प्रतिज्ञापत्रात सांगावे. राज्यपालांनी काही तरी निर्णय घ्यायला पाहिजे, असे नायायालयाने म्हंटलं आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १२ आमदारांच्या यादीबाबत राजभवनाकडे विचारणा केलीय. त्यांनी राजभवनाकडे विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री सांगतात की, यादी पाठविली म्हणून. मध्यंतरी मुख्यमंत्री सचिवालयाने यादी देण्यास यासाठी नकार दिला होता.
अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आणि आता राज्यपाल सचिवालय वेगळे उत्तर देत आहे. यादी पाठविली असेल तर मुख्यमंत्री सचिवालय आणि राज्यपाल सचिवालय यापैकी एकाने माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी देखील गलगली यांनी केलीय.