TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 23 मे 2021 – कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील भवानी पेठेतील मिलन व्हेज हॉटेलवर पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून एक लाखांचा दंड वसूल केला आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना टेबलवर बसून जेवण करू दिले. त्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद यांच्या पथकाने हि कारवाई केली.

आठ दिवस आगोदर बनकर हे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातून बदली होत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात रुजू झालेत. त्यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात असताना मार्च ते मे महिन्यात अशीच दंडात्मक कारवाई करत सुमारे २८ लाख रुपयांचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा केला होता.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा दोन दिवसा पूर्वी सहाय्यक आयुक्तांचा कार्यभार स्वीकारला होता. काल त्यांनी मिलन हॉटेलवर कारवाई करत १ लाख रुपयांचा दंड धनादेशद्वारे वसूल केला. यावेळी आरोग्य निरीक्षक संतोष कदम संजय साळुंके निसार मुजावर मोहन चांडले आदी अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

आम्ही त्यांना माणुसकी दाखवली..
“खरंतर आम्ही फक्त पार्सल सेवा सुरू ठेवलीय. परंतु काल बाहेरच्या शहरातील काही नागरिक जेवणासाठी आले होते. त्यांनी खूप विनंती केली. त्यामुळे आम्ही माणुसकी म्हणून बसून जेवायला दिलं, असे हॉटेल मालक मोहम्मद रईस अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.

सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी दोन दिवस अगोदार कार्यभार स्वीकारला असून त्यांनी ही पहिली कारवाई आहे. सर्वांच्या दृष्टीने आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सोमनाथ बनकर यांनी केले आहे.