खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या दिल्लीत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांनी भेट घेतली त्याचबरोबर रामदास आठवले हे स्वतः राणा दाम्पत्याला त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले होते. या सर्व घडामोडी होत असताना राणा दाम्पत्याने आज पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलेलं आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही त्यांनी केलेली आहे.
राणा दाम्पत्याच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
◆ जेल प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली होतं.
◆ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इंग्रजांच्या विचारावर चालत आहेत.
◆ उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली.
◆ 14 मे ला दिल्लीत शनिवारी हनुमान मंदिरात महाआरती करणार.
◆ मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी महाआरती करणार.
◆ जेलमध्ये असताना आम्हाला घराबाबत नोटीस दिली.
◆ राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं.
◆ मुंबई महापालिका शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची लंका.
◆ मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार.
◆ सत्तेच्या लोभासाठी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला.
◆ राजद्रोह लावण्यात आलेली महाराष्ट्रातील मी पहिली महिला खासदार.
◆ कितीही त्रास दिला तरी घाबरणार नाही, लढणार.
◆ मुख्यमंत्री निवडणूक लढणार का? कुठल्या मतदारसंघातून लढणार? मी तुमच्या विरोधात लढेल.
◆ आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत.
◆ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तब्येतीचे रिपोर्ट द्यावेत, मी माझ्या तब्येतीचे देईन.
◆ पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून लालच.
असे विविध मुद्दे घेत राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.