भंडारा : हवामान खात्याने २० जुलैपर्यंत जिल्ह्यात येल्लो अलर्ट जाहीर केला आहे. (Yellow alert announced in Bhandara district) त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत भंडारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील.
अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी दिले आहेत. (Sandip Kadam, Collector Bhandara) मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. काही नदी – नाल्यांना पूर आला असून ठेंगण्या पुलांवरून पाणी नागरिक पुलावरून पाणी वाहत आहे. अशा स्थितीत कामानिमित्त निघालेले असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडू शकते. सोमवार ते बुधवारपर्यंत हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे परिस्थती आणखी बिघडू शकते.
ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी भंडारा यांनी तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.