TOD Marathi

महिलांनी पुरुषांविरोधात Sex Strike आंदोलन करावं ; ‘या’ अभिनेत्रीचं आवाहन

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 7 सप्टेंबर 2021 – सर्व महिलांनी पुरुषांसोबत शारीरिक संबंधांना नकार द्यावा, असे खळबळजनक वक्तव्य एका अभिनेत्रीने केलंय. या अभिनेत्रीचं नाव बेट्टे मिडलर असे आहे. तिने महिलांना सेक्स स्ट्राईक म्हणजे सेक्स बंद आंदोलन करायचे आवाहन केलंय. पण, या आवाहनामागे एक विशिष्ट कारण आहे.

टेक्सासने गर्भपात संबंधित एक नवीन कायदा लागू केलाय. 1 सप्टेंबर पासून त्याची अंमलबजावणी सुरू झालीय. एसबी 8 असे नाव असलेल्या या कायद्याला टेक्सासचे महापौर ग्रेग एबॉड यांनी मान्यता दिलीय.

या कायद्यानुसार गर्भातील भ्रूणाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतील तर महिलेला गर्भपात करता येणार नाही. त्यामुळे टेक्सास राज्यातील अनेक गर्भपात क्लिनिकनी याला विरोध केलाय.

टेक्सासमधील सहा आठवड्यांनंतर गर्भपाताचं समर्थन करणाऱ्या वेबसाईट्सवर कारवाई केली आहे. तसेच उबेर आणि लिफ्ट सारख्या कंपन्यांनी हि कर्मचाऱ्यांवर बंधनं घातलीत. त्यांनी जर सहा आठवड्यांपेक्षा अधिक गर्भवती असलेल्या महिलांना गर्भपात करणाऱ्या क्लिनिकला सोडलं तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

या कायद्याला तिथल्या स्थानिक महिलांनीही विरोध केला असून या प्रकरणी एक याचिकाही तिथल्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. पण, त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.

त्यानंतरी बेट्टेने हे ट्वीट केलं आहे. ती म्हणाली की, माझा हा सल्ला आहे की सर्व महिलांनी पुरुषांसोबत सेक्स करण्यास नकार द्यावा. जोपर्यंत संसदेकडून त्यांना गर्भपातसंबंधीचे पर्याय उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन त्यांनी सुरू ठेवावं, असं बेट्टेने म्हटलंय.