मदतीचे आश्वासन देऊन भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर दोन आरोपीनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून अत्याचारानंतर तिला रस्त्याकाठी फेकल्याची उघडकीस आली आहे. सध्या या महिलेवर नागपुर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. (A Woman Raped In Bhandara District)
पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपीना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. (2 Accused Arrested In This Case) तर दूसरीकड़े सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्याने भंडारा पोलिसांनी संबधित गुन्हा गोंदिया पोलिसांना वर्ग केला आहे.
पीडित महिला हि पतीपासुन विभक्त होती आणि गोंदिया जिल्हातील गोरेगाव येथे बहिनीकड़े राहत होती. (Goregaon, Gondia) दरम्यान 30 जुलैला बहिनी सोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. ती भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आईकड़े जाणाच्या बहाण्याने निघाली असता संशयित आरोपीने तिला घरी सोडन्याच्या बहान्याने कारमध्ये बसवत गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलै ला पाशवी अत्याचार केला.
तर दुसऱ्या दिवशी 31 जुलैला पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार केला. नंतर आरोपीने तिथून पळ काढला. दरम्यान पीड़िता जंगलातून निघुन लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह येथे पोहचली असता जंगलात सोडले. कनाळमोह गावाजवळ असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली असता तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहान्याने आपल्या मित्रासोबत 1 ऑगस्ट रोजी तिला मदतीच्या बहान्याने पाशवी अत्याचार केला. अत्याचारानंतर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता दरम्यान विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला.
परिसरातील नागरिकांना दिसताच आणि पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस येताच महिलेची प्रकृती चिंताजन असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात करीत पुढील उपचारा करिता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलविले आहे.
पीडितेने सागितल्यानुसार भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपीना अटक केली असून आरोपी विरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कारधा पोलिस करीत आहेत. यात संपूर्ण गुन्हयात 3 संशयित आरोपीचा समावेश आहे, आता 2 आरोपीना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्हाची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्याने भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना 2 संशयित आरोपीसह गुन्हयाचा तपास वर्ग केला आहे. सद्धा दोन संशयित आरोपी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात असून एका फरार आरोपीचा शोध गोंदिया पोलिस घेत आहे. सध्या सपूर्ण तपास गोंदिया पोलिस करीत आहे.
पीडित महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून आणखी शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती आहे. या घटनेची उच्चस्तरीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील आता सर्व स्तरातून होत आहे.