TOD Marathi

मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये (Damoh, Madhya Pradesh) एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. आणि या वादातून वडिलांनी मुलाचा हात तोडला, एवढच नव्हे तर तो हात घेऊन वडील पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्या वडिलांना अटक केली आहे. (Police Arrested Father) मुलानं वडिलांना केवळ बाईकची चावी देण्यास नकार दिला होता. एवढ्या छोट्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वडिलांनी मुलावर हल्ला केला.

दमोहमधील जेरठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोबई नावाचं गाव आहे. गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास मोती काछी (वय ५२ वर्ष) (Moti Kachi) यांनी त्यांच्या ३० वर्षीय मुलगा संतोषकडे बाईकची चावी मागितली. मोती यांना बाहेर जायचं होतं. बाईकचा हप्ता भरताना तुम्ही मला काहीच मदत केली नाही, असं म्हणत मुलगा संतोषनं चावी देण्यास नकार दिला. असं संतोषनं वडिलांना बोलून दाखवलं आणि पुढे नको ते घडलं.