TOD Marathi

जाणून घ्या, ‘French fries’ हे France चे नसतानाही ‘याच’ नावाने का ओळखतात?

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 12 जून 2021 – कधी कधी आपणाला प्रश्न पडला असेल अमुक वस्तूला तमुक का म्हणतात अर्थात ते नाव का आहे?. मग, यातून आपली उत्सुकता वाढते. असेच आपण आता ‘फ्रेंच फ्राईज’बाबत जाणून घेऊया. ‘फ्रेंच फ्राईज’ हे फ्रान्सचे नसतानाही ‘याच’ नावाने का ओळखतात?. होय ना…

‘फ्रेंच फ्राईज’ उच्चारलं कि, तोंडाला पाणी सुटतं. बटाट्याच्या लांबट तळलेल्या, मीठ भुरभुरलेल्या खुसखुशीत सळ्या असं वर्णन करता येईल. त्यात आता चीज, पेरिपेरी असे प्रकारही मिळतात. पण, हे ‘फ्रेंच फ्राईज’ मूळचे फ्रान्सचे नाहीत, तरीही या पदार्थाला फ्रेंच हे नाव जोडलं गेलंय.

फ्रेंच फ्राईज हे नाव जन्माला आलं पहिल्या महायुद्धानंतर. पण, हे फ्राईज मूळचे एका वेगळ्याच देशाचे आहेत. तो देश चॉकलेट व वॉफल्ससाठी प्रसिद्ध आहे.

तो देश म्हणजे बेल्जियम. बेल्जियम चॉकलेट आणि बेल्जियम वॉफल्स म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. पण, या दोन्ही पदार्थांसोबत हे बटाट्याचे फ्राईजही बेल्जियममध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. बटाटा हा मुख्य अन्नपदार्थांपैकी एक असल्यामुळे तिथे बटाट्याचे हे फ्राईज सहज उपलब्ध होतय.

पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटीश, कॅनेडियन आणि अमेरिकन सैन्याचा तळ बेल्जियममध्ये होता. तेव्हा त्यांना हे तळलेले ‘फ्राईज’ दिले. पण, याचं नाव फ्रेंच भाषेत सांगितलं. बेल्जियम सैन्याची मुख्य भाषाही फ्रेंच होती.

इंग्लंड, कॅनडा आणि अमेरिकेच्या सैन्यांना ते ‘फ्रेंच’ नाव लक्षात ठेवणं जड वाटू लागलं. म्हणून त्यांनी फ्रेंच हेच नाव म्हणून घेत त्यांचं बारसं केलं. हळूहळू हेच नाव प्रसिद्ध होत गेलं व लोकांसाठी ‘बेल्जियम फ्राईज’ फ्रेंच फ्राईज झाले.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज