डोंबिवली: नाशिकमध्ये एकही खड्डा नाही. हे रॉकेट सायन्स नाही. पाच वर्षात आम्ही चांगले रस्ते बांधून दाखवले. तुम्ही २५ वर्षात चांगले रस्ते देऊ शकत नाही का, असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ते आज डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खड्ड्यांमुळे आज रस्तेमार्गाने कल्याण-डोंबिलवीत पोहोचायला दोन ते अडीच तास लागतात. लोकंच निवडणुकीच्या वेळी आता बोलतील. प्रवास करताना दररोज त्रास सहन करतायत. एका पक्षाच्या हातात २५ वर्ष सत्ता दिली. पण त्यांना चांगले रस्तेपण बांधता आले नाहीत. हे लोकांना कळतय. नाशिकचे रस्ते तुम्ही आताही जाऊन बघू शकता” असे अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारचे कंत्राटदारांशी लागेबंधे असल्यामुळे चांगले रस्ते जनतेला मिळत नाहीत. नाशिकमध्ये राजसाहेबांनी स्वत: लक्ष घातलं. नाशिकला चांगले रस्ते, बागा, पाणी मिळाले पाहिजे. ही त्यांची इच्छाशक्ती होती. पुढच्या ४० वर्षासाठी नाशिकला पाण्याच प्रश्न मिटला असल्याचे देखील यावेळी अमित ठाकरे म्हणाले.