टिओडी मराठी, लखनौ, दि. 24 जून 2021 – ‘रामाचे भक्तच दानपेटीवर डल्ला मारू लागले, तर काय करणार…?’ असं म्हणत समाजवादी पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी आज राम जन्मभूमी ट्रस्टने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारातील कथित भ्रष्टाचारारून निशाणा साधलाय.
राम जन्मभूमी ट्रस्टने एक भूखंड चढ्या भावाने खरेदी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर ट्रस्टतर्फे जमीन खरेदीचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आहे. हे आरोप दूषित हेतून प्रेरित आहे, असे म्हंटलं होत.
‘रामाचे भक्तच, दानपेटीवर डल्ला मारू लागलेत, आता काय करणार…? हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर त्यांनी पत्रकारांना आणि याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केलीय.
निर्लज्जपणाची पण, एक सीमा असते. एक तर तुम्ही भ्रष्टाचार उघडकीस आणणारी कागदपत्र खोटी आहेत? हे सांगा किंवा चौकशी लावा.’ अशी मागणी राम गोपाल यादव यांनी केली.
यानंतर या कथित घोटाळ्यावरून राजकीय वातावरण ही चांगले तापले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. तर भाजपतर्फे हा विरोधकांचा डाव आहे, असं म्हणणं आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेने याबाबत भूमिका मांडताना, सरसंघचालक आणि विश्व हिंदू परिषदेने याबाबतची भूमिका मांडावी, असे सुचवले होते. यानंतर मुंबई येथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं हि पाहायला मिळालं होतं.