टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जून 2021 – अनेकांची सर्व प्रकारच्या सेव्हिंग स्किम्समध्ये फिक्स्ड डिपॉजिटला (FD) पसंती असते. बचतीसाठी फिक्स्ड डिपॉजिटला सर्वच वयोगटातील लोकांचा प्रतिसाद लाभतो. इतर स्किम्सच्या तुलनेत फिक्स्ड डिपॉजिट सुरक्षित आणि सर्वात कमी रिस्क असलेली योजना आहे. यात कमी कालावधीपासून, दीर्घ काळापर्यंत यात गुंतवणूक करता येते.
जाणून घेऊ, दोन प्रकारचे फिक्स्ड डिपॉजिट-
सामान्यपणे फिक्स्ड डिपॉजिट दोन प्रकारच्या असतात. क्युमुलेटिव्ह एफडी आणि दुसरी नॉन क्युमुलेटिव्ह एफडी. यात तिमाही आणि वार्षिक आधारे व्याज मिळते.
फिक्स्ड डिपॉजिटवर टॅक्सबाबत नियम –
फिक्स्ड डिपॉजिटवर 0 ते 30 टक्क्यांपर्यंत टॅक्स कापला जातो. हा टॅक्स गुंतवणुकदाराच्या इनकम टॅक्स स्लॅबआधारे कट होतो. पॅन कार्ड कॉपी बँकेत जमा करावी लागते. जर पॅन कार्ड जमा केलं नाही, तर यावर 20 टक्के टीडीएस कट होतो.
गुंतवणुकदाराला जर कर कपात टाळायची असेल, तर त्यासाठी त्यांनी फॉर्म 15A बँकेत जमा करायला हवा. हे अशा लोकांसाठी लागू आहे, जे कोणत्याही इनकम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. कर कपात टाळण्यासाठी वरिष्ठ नागरिक फॉर्म 15H जमा करू शकतो.