TOD Marathi

पुणे | एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी राहुल याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरुन अटक केली.  राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह आढळल्यानंतर १९ जूनला या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी पाच टीम तयार करुन तपास सुरु केला. दर्शनासोबत राजगडावर गेलेला राहुल हंडोरे देखील गायब झाला होता. त्यामुळं त्याच्यावर संशय बळावला होता.

दर्शना पवार हिनं लग्नासाठी नकार दिल्यानं राहुल यानं तिचा खून केल्याचं पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राहुल यानं तशी कबुली दिल्याचं चौकशी केल्यानंतर पोलीस म्हणाले. तर, राहुल याला आज कोर्टात हजर केलं जाणार असून त्याची पोलीस कोठडी घेण्यात येईल.

हेही वाचा “…उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले…” 

गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे नातेवाईक नव्हते. दर्शना पवारच्या मामाचं घर आहे. त्याच्या समोरचं घर हे राहुल हंडोरे याचं होतं. त्यामुळं ते एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, असं अंकित गोयल म्हणाले.

राहुल पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पार्ट टाईम जॉब देखील करत होता. तो एका कंपनीसाठी फूड डिलिव्हरी करण्याचं काम करत होता. मात्र, दर्शना पवार हिनं परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हे कृत्य केलं असावं, असा पोलिसांना अंदाज आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज