TOD Marathi

Volvo XC40 फेसलिफ्ट भारतात लॉन्च ; पाहा फोटो

संबंधित बातम्या

No Post Found

Delhi: सेफेस्ट कार या नावाने ओळखले जाणारे Volvo कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने भारतामध्ये आपल्या लक्झरी कर XC40 फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले आहे.

Volvo Cars India ने आपल्या लक्झरी कार XC40 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. यामध्ये फक्त एक पेट्रोल इंजिनचा ऑप्शन देण्यात आला आहे. जो लाईट हायब्रीड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.

नवीन व्होल्वो XC40 फेसलिफ्टमध्ये 12.3-इंच सेकंड जनरेशन ड्रायव्हर डिस्प्ले, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स, क्रिस्टल गियर नॉब, पुढच्या रांगेत दोन टाईप-सी पोर्ट, वायरलेस चार्जिंग सपोर्ट, ट्रॅफिक अलर्ट यांसारखी इतर अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

नवीन Volvo XC40 फेसलिफ्टमध्ये लाईट हायब्रिड 2.0-L टर्बो-पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 197bhp पॉवर आउटपुट आणि 300Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, कार 48V इलेक्ट्रिक मोटरसह लाईट-हायब्रिड प्रणालीशी जोडलेली आहे.


नवीन व्हॉल्वो XC40 फेसलिफ्टमध्ये नवीन डिझाईन केलेले 18-इंच अलॉय व्हील, इंडिकेटर-माउंटेड ORVM, फ्रेमलेस ग्रिल, फ्लेर्ड व्हील आर्च, एअर डॅम, एलईडी हेडलाइट्ससह Volvo XC40 चा लूक ग्राहकांना आकर्षित करणारा आहे.

नवीन Volvo XC40 फेसलिफ्ट कंपनीने एकूण पाच कलरमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये क्रिस्टल व्हाईट, फजॉर्ड ब्लू, फ्यूजन रेड, ओनिक्स ब्लॅक आणि सेज ग्रीन या रंगांचा समावेश आहे.

ही नवीन XC40 फेसलिफ्ट कार व्होल्वोने 43.20 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे. असे असले तरी मात्र, या कारची किंमत सणासुदीच्या काळापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 45.90 लाख रुपये असेल.

यानंतर या कारची एक्स-शोरूम किंमत 45.90 लाख रुपये असेल.