Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पत्नीची प्रकृती बिघडली

TOD Marathi

मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांवर आणि राजकीय सामाजिक वर्तूळात शोककळा पसरली आहे. मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विनायक मेटे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. (Shivsangram Chief Vinayak Mete passes away in Road Accident)

विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्याचं समजतं. त्यांना सलाईन लावण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. (CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis, Opposition Leader Ajit Pawar met Vinayak Mete’s Family)

मेटे यांच्या पत्नीचं सांत्वन केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. मेटे यांचा फोन कधीही स्विच्ड ऑफ लागायचा नाही. पण अपघाताची बातमी समजल्यावर जेव्हा मेटे यांच्या पत्नीनं त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो बंद होता, असं मेटे यांच्या पत्नीनं सांगितल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावरही शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायक मेटे यांचं पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी आणलं जाणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाच्या वतीने मिळाली आहे.

दुपारी तीन पर्यंत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बीडमधील आणखी एक दर्दी नेतृत्व हरवल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज