TOD Marathi

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं. मात्र, कार चालकाच्या दाव्यावर संशय व्यक्त करत मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मेटेंच्या मृत्यू प्रकरणाभोवती संशयाचं वलय निर्माण झालं आहे. राज्य सरकारने याची दखल घेत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

दरम्यान, विनायक मेटे यांचा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं आधीही सांगितलं होतं. ही चौकशी पारदर्शकपणे व्हावी, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली होती.