TOD Marathi

त्या रात्री दहाच्या सुमारास सासवडहून( sasvad)  कात्रजकडे (katraj) जाणारी शेवटची गाडी सुटली. या गाडीत ‘ती’ एकमेव महिला प्रवासी होती. ११:४५ वाजण्याच्या सुमारास गाडी कात्रज येथे आली. या महिलबरोबर तिचं एक बाळ आणि सामानाच्या दोन-तीन पिशव्या होत्या. महिलेच्या नातेवाईकांकडून तिला घ्यायला येऊ, असं सांगण्यात आले होते. मात्र पंधरा-वीस मिनिटे उलटून गेली तरी त्या महिलेच्या घरचे कोणी आले नाही. त्यामुळे (pune) पीएमपीचे कंडक्टर नागनाथ ननवरे यांनी गाडीतील दिवे सुरू ठेवून महिलेला गाडीत बसविले आणि तिच्या नातेवाईकांची वाट पहात बसले.

त्या बसमध्ये ती एकटी महिला आणि बाकी सगळे पुरुष होते. त्यामुळे बसचे चालक आणि वाहक पहिल्यापासूनच सावध होते. मात्र त्या महिलेला नेण्यासाठी कोणीच येईना म्हणून त्यांनी त्या महिलेच्या नातेवाईकांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन काही लागत नव्हता.

पुढे माजी नगरसेवक वसंत मोरे (vasant more) तेथे आले. आणि त्यांनी त्या महिलेला सुरक्षितपणे त्यांच्या गाडीतून घरी सुखरूप सोडले. मात्र प्रवाशांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असल्याने वाहक नागनाथ ननवरे यांनी महिलेसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला याच निर्णयाला चालक अरुण दसवडकर यांनीही मोलाची साथ दिली.