TOD Marathi

महाराष्ट्रात शिवसेना पक्षाला खिंडार पाडल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिशेला वळवला आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (BJP leader and Union Finance Minister Nirmala Sitharaman) आता पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman) दीड महिन्यांपूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. आणि त्यानंतर आता पुन्हा त्या तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला सीतारामन ( Nirmala Sitharaman) यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह (Prahlad Singh) दिनांक 11 आणि 12 नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर येणार आहेत.

निर्मला सीतारामन यांच्या मागच्या दौऱ्यापेक्षा यावेळचा दौरा हा खूप मोठा असणार आहे. हा दौरा खुप मोठा आणि आकर्षक आणि वेगळा करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या दौऱ्यात भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघावर आपले विशेष लक्ष असणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघात कंबर कसून प्रयत्न सुरु आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने बारामती मतदारसंघात प्रचंड जोशात प्रचार केला होता, अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या. आणि तरी देखील या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला.

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद लावण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. बारामती पवारांचा बालेकिल्ला. शरद पवारांचं (Sharad Pawar) बारामतीवर प्रेम आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि बारामती यांचं परस्परांशी एक भावनिक नातं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वात प्रमुख नेत्याला त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवलं तर त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांवर पडेल. सोबतच पक्षातही नकारात्मक वातावरण पसरेल, अशी भाजपची धारणा असू शकते. आणि त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपचं जास्त लक्ष आहे.