TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 19 मे 2021 – सध्या देशात कोरोना संसर्ग असल्यामुळे अनेक महत्वाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता UGC NET परीक्षेच्या तारखाही होणार जाहीर का ?, असा प्रश्न विचारला जातोय. जर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर एजन्सीच्या हेल्पलाइन 011-4075900 वर कॉल करा, असेही सांगितले आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षांच्या (एनटीए) नवीन तारखांबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. एनटीएने 2 ते 17 मे या कालावधीत डिसेंबर 2020 च्या यूजीसी नेट परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

या दरम्यान, विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, युजीसी नेटच्या परीक्षांसाठी लवकर सरकार कोणतीही घोषणा करू शकते. परीक्षा आयोजित करण्याच्या नवीन तारखांसह यूजीसी नेट प्रवेशपत्र 2021 डाउनलोडसाठी उपलब्ध करुन देण्याच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या जातील, असेही युजीसीने म्हटले आहे.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी 20 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2020 च्या काळातील मे 2021 मध्ये प्रस्तावित परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. एजन्सीने आपल्या नोटिसमध्ये म्हटलंय की, मे 2021 परीक्षेच्या नवीन तारखांच्या किमान 15 दिवस आधी उमेदवारांना सूचित करण्यात येईल.

यूजीसी नेट मे 2021 साठी हि आहे ‘हेल्पलाइन’ :
एनटीएने यूजीसी नेट मे 2021 च्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे संबंधित उमेदवारांचे प्रश्न सोडविण्यासाठी हेल्पलाइन जारी केलीय. ज्या उमेदवाराला यूजीसी नेट परीक्षा किंवा प्रवेश पत्र संबंधित काही प्रश्न असतील, त्यांनी एजन्सीच्या हेल्पलाइन 011-4075900 वर कॉल करून किंवा ugcnet@nta.ac.in वर ईमेल करून माहिती घेऊ शकता.