TOD Marathi

महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी संजय राऊत यांना सनसनाटी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील सरकार का पडले, कसे पडले इथपासून ते उद्याच्या शिवसेनेच्या भवितव्यापर्यंतच्या सगळ्यांना प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली आहेत. आपला महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? असा थेट सवाल संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या नजरेला नजर मिळवून विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी काही सेकंद पॉज घेतला अन् महाविकास आघाडीचा प्रयोग अजिबात फसलेला नाही. (Uddhav Thackeray Interview Saamna)

महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जर प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. पण तसं झालं नाही. कारण जनता आनंदी होती. आपण सत्तेत आल्या आल्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले होते. लोकांना सरकारचं काम आवडलं होतं. त्यामुळे तर जनतेला मी त्यांच्या घरातील सदस्य वाटायचो… कदाचित हीच गोष्टी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना खटकली असावी. आपला महाविकास आघाडीचा प्रयोग अजिबात फसला नाही, उलट आपल्या कामाने तो यशस्वी झाला, असंही उद्वव ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोना काळामध्ये (Covid 19) मी अभिमानाने सांगेल, माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणूनच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या ५ मध्ये माझं नाव आलं… ते नाव मी माझं मानत नाही तर ते जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझं नाव आल्याचं समजतो. मंत्र्यांनी-अधिकाऱ्यांनी-जनतेने जर सहकार्य केलं नसतं तर मी कोण होतो? मी एकटा काय करणार होतो? कारण मी घराच्या बाहेरही पडत नव्हतो कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो..”

कोरोनाकाळातील आपला अनुभव सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सुरुवातीच्या काळामध्ये कोरोनाचा आपल्याकडे शिरकाव झाला आहे हे कळलं तेव्हा राज्यामध्ये साडेसात ते साडेआठ हजार रुग्णाशैय्या होत्या. त्यात ऑक्सिजन बेड आले, व्हेंटिलेटर आले… पहिल्या लाटेत आपण आठ हजार बेड्सवरुन साडेतीन लाखांपर्यंत गेलो होतो… हे मी घरबसल्या केलं.. हॉस्पिटलमध्ये बेड्स नव्हते रुग्णवाहिका नव्हत्या, मग एक महिन्यात मोठा फरक दिसला, मग हे कसं झालं, कुणी केलं? कोरोनाच्या टेस्टसाठी आपल्या राज्यात फक्त दोन प्रयोगशाळा होत्या एक कस्तुरबा आणि दुसरी पुण्यात… आपण संपूर्ण राज्यात सहाशेच्या वर प्रयोगशाळा उभारल्या… तेही काम मी घरी बसून केलं… मग जर मविआचा प्रयोग झाला नसता तर हे काम मला करता आलं नसतं. माझं काम जनतेला आपलं वाटलं, मी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यावर जनतेच्या डोळ्यात अश्रू होते, यातंच सगळं आलं, असं प्रेम कुणाच्याही नशिबी नसतं..” (Uddhav Thackeray Shared His Experiences)