काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर टिका केली. मुख्यमंत्री प्रचारासाठी तेलंगणाला गेल्यामुळे ठाकरेंनी त्यांच्यावर तोफ डागली. यावेळी बोलताना ठाकरे आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरेंना अटक होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले “राज्यातील शेतकरी संकटात असताना जो माणून स्वतःच्या घराची काळजी न करता दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. आणि अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाही”
आता यामुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या विधानावर बोलताना देसाई म्हणाले ” उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याची व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. हे असंसदीय शब्द आहेत. आणि त्यांचा विचार होऊ शकत नाही. त्याबाबत ती क्लिप मिळवल्यानंतर कायदेतज्ज्ञांशी चर्चा करेन. कायदेतज्ज्ञांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबतीत योग्य निर्णय घेऊन कारवाई करण्याबाबतीत आम्ही विचार करत आहोत”
शिवाय यावेळी नारायण राणेंबद्दलचा तो किस्सा सांगयला देसाई विसरले नाही. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले “ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्याबाबत ज्यांनी वक्तव्य केले होते (नारायण राणे ) त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका घेणे शक्य आहे. आता आम्ही व्हिडिओ-ऑडिओ क्लिप बघून त्यावर विचार करू.” त्यामुळे आता पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे