नोएडा : ल्या आठ दिवसांपासून ज्या नोएडा सुपरटेक ‘ट्विन टॉवर’ चर्चा सुरू होती. आता ते टॉवर इतिहासजमा झाला आहे. ट्विन टॉवर अवघ्या १२ सेकंदात जमीनदोस्त झाला आहे. काही मिनीटांपूर्वी म्हणजे २ वाजून ३२ मिनीटांनी टॉवर पाडण्यात आला आहे. १२ सेकंदात ३०० कोटी उद्धवस्त झाले आहेत. तर टॉवर पाडल्याने आजूबाजूच्या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झाले होते. दरम्यान, दोन्ही इमारतींच्या परिसरात जवळपास ७ हजार लोकं राहतात. मात्र, टाॅवर पाडण्यापूर्वी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
अवघ्या १२ सेकंदात संपूर्ण टॉवर पत्याच्या बंगल्यासारखा हा टॉवर कोसळला. हा टॉवर कोसळताना पाहण्यासाठी या परिसरातील इमारतीतील लोक इमारतीच्या टेरेसवर गेले होते. तसेच हा टॉवर कोसलताना पाहण्यासाठी बघ्यांमी प्रचंड गर्दी केली होती. टेरेस आणि टॉवर परिसरात जत्रेसारखी गर्दी झाली होती. अनेकांनी तर हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला.