टिओडी मराठी, पुणे, दि. 5 सप्टेंबर 2021 – बदलत्या जगात सज्ज राहण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि ई-लर्निंग स्कूलसारखे पर्याय निवडले पाहिजेत. या माध्यमातून विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच या माध्यमातून जागतिक पातळीवरील ज्ञानाशी आपली नाळ जोडली जाईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांच्या विकासनिधीतून कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून सर्वे नंबर 9 वेदांत नगरीजवळ 100 फुटी डी.पी.रोड कर्वेनगर इथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल उभारले आहे. या ई-लर्निंग स्कूलचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी कॅाग्रेंस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे म.न.पा आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादी कॅाग्रेंस पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी महापौर अंकुश काकडे, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, रवींद्र आण्णा माळवदकर, पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दिपक मानकर, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक बाबुराव चांदरे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, पुणे मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अधिकारी मीनाक्षी राऊत, शंकर अंभ्यकंर, दिपक बेलदरे, राहुल पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, पालिकेच्या माध्यमातून विकास कामे केली जात असताना सर्वसाधारणपणे नगरसेवक त्यांच्याच घरातील कोणाचे तरी नाव देतो, पंरतू आज उद्घाटन होत असलेल्या ई-लर्नींग स्कुलच्या इमारतीस नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम असे नामकरण करून नवीन आदर्श निर्माण केलाय. माझा कलाम यांच्याशी घनिष्ठ संबंध होता.
अतिशय साधी राहणी, कसलेही व्यसन नाही आणि कायंम राष्ट्रच्या प्रगतीचा ध्यास, असे कलाम हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी विकसित केलेल्या अनेक क्षेपणास्त्रांना त्यांनी भारतीयांची अस्मीता जपली जाईल असेच त्या क्षेपणास्त्रांचे नामकरण केले.
प्रयोग यशस्वी झाल्यास त्यांचा आनंद चेह-यावरुन ओसांडून वाहत असे आणि कधी चुकून एखादा प्रयोग अयशस्वी झाल्यास डोळ्यातून अश्रु ओघळताना मी पाहिले आहे. ते अश्रु पुसून त्यांनी वैज्ञानिकांना देखील सातत्याने प्रेरित करण्याचे काम केलं.
शास्त्रीय संगीताची आराधना करणारे कलाम यांनी आधुनिकता, विज्ञान आणि चारित्र्य यास कायंम प्राधान्य दिले. आज त्यांच्याच नावाने सुरु होणा-या या शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांमध्ये आपोआपोच हे तीन गुण पाझरतील. कलामांनी सतत विज्ञान आणि वैज्ञानिकांना प्रेरित करण्याचे काम केलं.
यावेळी खासदार वंदना चव्हाण यांनी ई लर्निंगमध्ये देण्यात येणारे शिक्षणही महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती दिली तर नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांनी शाळा उभारण्यामागची संकल्पना सांगितली. तर कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी प्रास्ताविक केले. वि.दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले आणि पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी आभार मानले.