मुंबई:
राज्यसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, नाना पटोले (Nana Patole) उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. आपण राज्यसभेची जागा जिंकूच असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे या बैठकीला अपक्ष आमदारांचीही मोठी उपस्थिती होती.
जवळपास २९ अपक्ष आमदारांपैकी १३ आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली. २०१९ मध्येही महाविकास आघाडी स्थापन होत असताना २५ आमदारांनी समर्थन दिले होते. यातील १३ आमदारांनी बैठकीला उपस्थिती लावली.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणी कितीही काही जरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच, अशी प्रतिक्रिया दिली.
‘हे’ आमदार होते बैठकीला उपस्थित
या आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली. विधानसभेत एकुण २९ अपक्ष आमदार अपक्ष आहेत. यातील १३ आमदार बैठकीला उपस्थित होते, राहीलेले १६ आमदार नेमके कोणाला मतदान करणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे.