टिओडी मराठी, बुलडाणा, दि. 6 सप्टेंबर 2021 – ठाकरे सरकारला राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यानेच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे विरोधकांना देखील हि संधी सापडली आहे. राष्ट्रवादीने घेतलेल्या एका मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यामध्ये संबोधित करताना राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शने करा असा अजब सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात आपले सरकार असले तरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शने करा असा सल्ला राष्ट्रवादीचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे मेळावा घेण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजेंद्र शिंगणे म्हणाले, जरी आपलं सरकार असलं आणि आपल्या मना विरोधात काम होत असेल, तर आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलने करा.
या त्यांच्या वक्त्यावामुळे विरोधकांना चांगली संधी सापडली आहे. सध्या कोरोना आहे म्हणून ठाकरे सरकार काळजी घेत आहे. त्यातच घराचा आहेर मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.