TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 सप्टेंबर 2021 – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरु्दध पुरावे देण्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या वाहनात पिस्तुल सापडल्यामुळे परळीत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून रेणू शर्मा नंतर आता करुणा शर्मा नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

कोण आहेत करुणा शर्मा? –
जानेवारी महिन्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजकीय वर्तृळात खळबळ झाली. रेणू शर्मा हीने थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली होती. एवढंच नव्हे, तर तक्रारीच्या प्रतीचा फोटोही तिने टि्वट केला होता.

याप्रकारामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. कारण, रेणू शर्मा हीने तक्रारीमध्ये धनंजय मुंडे यांच्याशी पहीली भेट मध्यप्रदेशातील इंदौर येथे बहीण करुणा शर्मा हीच्या घरी झाल्याचे म्हटले होते. तसेच धनंजय मुंडे यांनी माझी बहीण करुणा शर्मा हीच्याबरोबर १९९८ मध्ये प्रेमविवाह केल्याचा गौप्यस्फोटही रेणू शर्माने केला.

त्यासह धनंजय मुंडेनी आपल्यावर बलात्कार केल्याचंही तिने तक्रारीत म्हटल होतं. रेणू शर्मा प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची राज्यात नाचक्की झाली होती. विरोधकांनी याच मुद्द्यावरून मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

यामुळे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबरोबर विवाह केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांना दोन मुलं असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. धनंजय मुंडेच्या या छुप्या लग्नाच्या बातमीने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा, रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ आपल्याला ब्लॅकमेल करत आहे, असे सांगितले. तसेच करुणा शर्मा यांच्याविरोधातील दावा न्यायालयात प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर रेणू शर्मा हीने धनंजय मुंडेविरोधातील तक्रारही मागे घेतली होती. यामुळे रेणू शर्मा आणि करुणा शर्मा विषय़ संपला होता. मात्र, काल करुणा शर्माने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत धनंजय मुंडेची पोलखोल करणार आहे, असा दावा केल्याने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलं आहे.