Super Blood Moon : खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, 26 मे रोजी चंद्र मोठा आणि तांबूस दिसेल; सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत येणार

टिओडी मराठी, दि. 20 मे 2021 – आपण पृथ्वीवर राहतो. म्हणून आपण चंद्राला पाहू शकतो. पण, पूर्ण चंद्र पाहू शकत नाही. तो बऱ्याचवेळा ग्रहणाच्यावेळी पाहू शकतो. त्याहीवेळी नेमका चंद्र कसा आहे? हे दिसत नाही. खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, 26 मे रोजी चंद्र मोठा आणि तांबूस दिसेल. पूर्व दिशेला 26 मे रोजी संध्याकाळी संपूर्ण चंद्रग्रहण आहे. यानंतर आकाशात एक दुर्मिळ आणि मोठा तांबूस रंगाचा सुपर ब्लड मून दिसेल. मात्र, दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमधील लोकांना हे ग्रहण दिसणार नाही.

एम.पी.बिर्ला प्लॅनेटेरियमचे दिग्दर्शक आणि प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ देबिप्रसाद दुआरी यांनी सांगितले आहे की, कोलकातामधील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण 10 वर्षांपूर्वी 10 डिसेंबर 2011 रोजी दिसले होते. 26 मेच्या रात्री सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत असणार की पृथ्वीवरून हे चंद्रग्रहण दिसेल. काही काळ ग्रहण लागेल. पृथ्वीभोवती फिरत असलेला चंद्र काही क्षण पृथ्वीच्या सावलीतून जाणार आहे. यावेळी ते पूर्णपणे ग्रहण होईल.

संपूर्ण चंद्रग्रहण पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर आणि दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांतून दिसणार आहे. चंद्राचे अर्ध ग्रहण दुपारी 3.15 च्या सुमारास प्रारंभ होणार असून संध्याकाळी 6.22 वाजता समाप्त होणार आहे.

भारतातील बहुतेक भागात पूर्ण चंद्रग्रहणाच्यावेळी चंद्र पूर्व क्षितिजाच्या खाली असणार आहे. म्हणूनच देशातील लोकांना पूर्ण चंद्रग्रहण दिसणार नाही. परंतु काही भागांत, पूर्व भारतातील बहुतेक भागांत लोक चंद्रग्रहणाचा शेवटचा भागच पाहतील, तेहि पूर्वेच्या आकाशाच्या भागात जेव्हा चंद्र जवळून जात असेल त्यावेळी.

संध्याकाळी 6 :15 वाजता कोलकातामध्ये चंद्र बाहेर येईल आणि इच्छुकांना काही मिनिटांसाठी अर्ध चंद्रग्रहणाची झलक पाहायला मिळेल. ते संध्याकाळी .6 :22 वाजता संपणार आहे. तर दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमधील लोकांना हे ग्रहण दिसणार नाही.

Please follow and like us: